
अतिक्रिकेटच्या जमान्यात वेगवान गोलंदाजाने सलग क्रिकेट खेळणे अशक्य झाले आहे. देश-विदेशातील दौरे, स्थानिक क्रिकेट, आयपीएल सारख्या स्पर्धा यामुळे वेगवान गोलंदाजांना दुखापतीही होत आहे. वेगवान गोलंदाजांना दुखपतीतून सावरण्यासही वेळ लागतो, मात्र एक असा खेळाडू आहे जो 2008 पासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सलग खेळत आहे. यंदाही तो मुंबई इंडियन्स संघाकडून मैदान गाजवताना दिसेल. या खेळाडूचे नाव आहे धवल कुलकर्णी.
IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे नाव वाचून व्हाल अवाक
उजव्या हाताने गोलंदाजी करणारा धवल कुलकर्णी 2008 पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळताना दिसला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आयपीएलमध्ये किमान 1 तरी सामना तो खेळला आहे. यंदा तो मुंबईच्या संघात असून मुंबईने त्याला 75 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. अर्थात पहिली काही वर्षे मुंबईकडून खेळलेल्या धवल कुलकर्णी याची एकप्रकारे ‘घरवापसी’ झाली आहे.
IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार
धवलने 2008 ते 2013 या वर्षात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले, यानंतर 2014-15 या वर्षी तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. 2016-17 या वर्षी त्याला गुजरात लायन्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, तर 2018-19 हे वर्ष तो राजस्थान रॉयल्स संघात होता. आता 2020-21 वर्षासाठी त्याला मुंबईने आपल्या संघात घेतले आहे.
IPL 2020 – ‘हिटमॅन’ला बाद करत चावलाचा विक्रम, टॉप 3 विकेट टेकर गोलंदाजात ‘एन्ट्री’
अशी आहे प्रत्येक वर्षातील कामगिरी
धवल कुलकर्णी याने 2008 ला 10 लढतीत 11 बळी, 2009 ला 8 लढतीत 5 बळी, 2010 ला एका लढतीत 1 बळी, 2011 ला 6 लढतीत 5 बळी, 2012 ला 2 लढतीत 6 बळी, 2013 ला 6 लढतीत 8 बळी, 2014 ला 8 लढतीत 6 बळी, 2015 ला 11 लढतीत 13 बळी, 2016 ला 12 लढतीत 18 बळी, 2017 ला 6 लढतीत 3 बळी, 2018 ला 8 लढतीत 4 बळी आणि 2019 ला 10 लढतीत 6 बळी घेतले आहेत. धवलने आयपीएलमध्ये एकूण 90 लढती खेळल्या असून यात त्याने 86 बळी घेतले आहेत.
बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश
























































