
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्जचा 7 धावांनी पराभव केला. हैद्राबादने विजयासाठी दिलेले 165 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवले नाही आणि धोनीचा संघ 20 षटकात 5 बाद 157 धावा करू शकला. दरम्यान, आयपीएलमधील हैद्राबादचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा विजय आहे, तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव.
सनरायझर्स हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या. प्रियम गर्ग याने 26 चेंडूत 51 धावांची खेळी केली, तर अभिषेक शर्माने 31 धावांचे योगदान दिले.
165 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे 4 फलंदाज 42 धावांवर बाद झाले. यानंतर जडेजा आणि धोनी या दोघात 50 धावांची भागीदारी झाल्याने चेन्नईच्या विजयाच्या आशा उंचावल्या. मात्र जडेजा 50 धावांवर बाद झाला. यानंतर धोनी आणि कुरन यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. अखेरच्या षटकात 28 धावांची गरज असताना चेन्नई 20 धावा करू शकला आणि हैद्राबादने 7 धावांनी विजय मिळवला. धोनी 47 तर कुरन 15 धावांवर नाबाद राहिला.
IPL 2020 – हरभजन-रैनाला चेन्नईचा संघ आणखी एक दणका देण्याच्या तयारीत






























































