IPL 2022 दु:खद! सामना सुरू असताना बहिणीचे निधन, स्टार खेळाडू बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2022) शनिवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात सामना खेळला गेला. हा सामना बंगळुरुने 7 विकेट्सने आरामात जिंकला. मात्र बंगळुरुच्या विजयाच्या आनंदामध्ये दु:खाचे विरजण पडले असून स्टार खेळाडू हर्षल पटेल याच्या बहिणीचा सामना सुरू असतानाच मृत्यू झाला. सामना संपल्यानंतर ही गोष्ट समजताच हर्षल पटेल याने बायो बबल तोडून घरी धाव घेतली आहे.

आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिया टूडेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, दुर्भाग्यपणे हर्षल पटेल याला कुटुंबातील एका व्यक्तीच्या अकाली निधनामुळे बायो बबल सोडून जावे लागल्याचे म्हटले आहे. निधन झालेली व्यक्ती हर्षल पटेल याची बहीण असून त्यामुळे हर्षल पुण्यातूनच मुंबईत न येता आपल्या घराकडे रवाना झाला आहे. तो 12 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी बायो बबलमध्ये परत येईल, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षल पटेल याने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांमध्ये अवघ्या 23 धावा देत दोन बळी घेतले. रोहित शर्माला त्याने एका स्लो बॉलवर फसवले आणि स्वत:च्याच गोलंगदाजीवर झेल घेत बाद केले, तर रमनदीप सिंग याला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी बाद केले.

IPL 2022 हीच ती 5 कारणे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला पहावा लागला पराभवांचा चौकार

पर्पल कॅप

हर्षल पटेल याने गेल्या वर्षी आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांचे मन जिंकले होते. त्याने आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप पटकावली होती. 15 मॅचमध्ये त्याने 32 बळी घेतले होते.

IPL 2022 अजब-गजब! एकाच लढतीत फलंदाजाने दोनदा झळकावले अर्धशतक