IPL 2026 – वैभव सूर्यवंशीच्या वादळात हैदराबाद उडाली; आता राजस्थानचा गुजरातशी महासंग्राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर 47 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. न्यू चंदीगडमधील महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करत राजस्थानने वैभव सूर्यवंशीच्या अवघ्या 29 चेंडूत 97 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 8 बाद 243 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची सुरुवातच खराब झाली आणि नियमित अंतराने विकेट्स गमावत संपूर्ण संघ 19.2 षटकांत 196 धावांत गारद झाला. नीतीश रेड्डी (38) आणि सलील अरोरा (35) यांनी सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुरा ठरला. या विजयासह राजस्थान आता 29 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार असून विजेता संघ अंतिम फेरीत बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे.