
गृह विभागाने आज दोघा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त महेश पाटील आणि पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली.
राज्याच्या दहशतवाद विरोधी कक्षात उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले महेश पाटील यांची ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काहीच महिन्यांपूर्वीच पाटील यांची मुंबई वाहतूक विभागातून एटीएसमध्ये बदली दाखविण्यात आली होती. एटीएसमध्ये काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा त्यांची ठाणे शहरात बदली करण्यात आलेली. दरम्यान, नागपूर लोहमार्गचे अधीक्षक सुनील कडासने यांची बुलढाणा जिह्याच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


























































