
सामना ऑनलाईन। इस्लामाबाद
कश्मीरमधून 370 कलम हटवल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले, परंतु पाकडय़ांनी घेतलेला हा पंगा त्यांना चांगलाच नडला आहे. पाकिस्तानात खाण्या-पिण्याचे दर गगनाला भिडले आहेत.
अटारी-वाघा मार्गावरून पाकिस्तानात रोज जाणारे टोमॅटोचे 75 ते 100 ट्रक पाठवणे व्यापाऱयांनी बंद केल्यामुळे पाकिस्तानात टोमॅटोचे भाव 300 रुपये इतके वाढल्याचे टोमॅटो व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.



























































