पंतप्रधानांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, इस्रायलमध्ये गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पत्नी सारा नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. पंतप्रधान निवास्थानातील निधीच्या कथित गैरवापराप्रकरणी हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे इस्रायलचे राजकारण तापले आहे.

Israel Prime Minister Benjamin Netanyahu’s wife charged with fraud over alleged misuse of funds at Prime Minister’s residence (File pic) pic.twitter.com/TSuFHm9esz

— ANI (@ANI) June 21, 2018

या आधी खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भ्रष्टाचारात अडकल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर खटला चालविण्याची शिफारस देखील पोलिसांनी केली गेली आहे. विदेशी पाहुण्यांकडून महागडे गिफ्ट घेणे, सरकारची भलावण करणाऱ्या बातम्या छापण्यासाठी वृत्तपत्रांवर दबाव टाकणे हे आरोप नेतन्याहूंवर ठेवण्यात आले आहेत. भ्रष्टाचार करून त्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

मात्र असे आरोप झाल्यानंतर देखील नेतन्याहू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

पोलिसांनी १४ महिने तपास केला; सात वेळा चौकशी

पंतप्रधानविरुद्धच्या तक्रारींची दखल घेऊन इस्रायली पोलिसांनी न घाबरता १४ महिने सखोल तपास केला आणि नेतान्याहू दोषी असून त्यांच्यावर खटला चालवा अशी शिफारस अॅटर्नी जनरलकडे केली होती. पोलिसांनी सात वेळा नेतान्याहू यांची चौकशी केली आहे.