विक्रमशी संपर्क नाही, मात्र ऑर्बिटर करतोय चोख काम -इस्रोने दिली खुशखबर

928

चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर असताना संपर्काबाहेर गेलेल्या विक्रम लँडरशी अद्याप संपर्क करण्यास इस्रोला यश मिळालेले नसले तरी चांद्रयान 2 चा ऑर्बिटर मात्र व्यवस्थित काम करत असल्याची खुशखबर इस्रोने दिली आहे. ऑर्बिटरमध्ये 8 इन्स्ट्रुमेंटस असून प्रत्येक इन्स्ट्रुमेंटस आपले काम करत आहे. आम्ही त्यांची चाचणी केली असून ऑर्बिटर चोखपणे आपली कामगिरी बजावत आहे. अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. त्याचबरोबर आमचे पुढील प्राधान्य गगनयान मिशन असल्याचेही सिवन यांनी म्हटले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठी रात्र सुरू झाल्याने विक्रमबरोबर संपर्क होण्याच्या आशाही धूसर झाल्या आहेत. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबरनंतर सुरू झालेली ही रात्र मिट्ट काळोखाची असते. यात कुठलीही वस्तू दिसणं अशक्यच आहे. अशा परिस्थितीत इस्रोच नाही तर जगातील कोणत्याही अंतराळ संस्थेला विक्रम लँडरचा फोटो घेणे अशक्य आहे. चंद्रावर पुढील 14 दिवस काळोखी रात्र असणार आहे. यामुळे हे 14 दिवस विक्रम चंद्रावर एकटाच असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या