
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये केरन सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानच्या बॅट( बॉर्डर अॅक्शन टीम) सैनिकांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. यावेळी जवानांनी बॅट सैनिकांसह 7 दहशतवाद्यांचा खात्ना केला आहे. 31 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान रात्रीच्या वेळेस जवानांनी ही कारवाई केली आहे. केरन सेक्टरमधील या कारवाईचे फोटो व्हायरल झाले आहेत. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याने दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले नाही. असे पोलिसानी सांगितले आहे.
या फोटोमध्ये नियंत्रण रेषेपलिकडे चार मृतदेह दिसत आहेत. हे मृतदेह पाकिस्तानच्या एसएसजी कमांडो किंवा दहशतवाद्यांचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जम्मू-कश्मीरमद्ये दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर शुक्रवारपासून येथे शोध महिम सुरू करण्यात आली. मात्र या मोहिमेत अडथळे आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने होत आहे. गेल्या 36 तासात पाकिस्तानकडून घुसखोरीचेही अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. जम्मू-कश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
पाकिस्तानचे बॅट सैनिक दहशतवाद्यांसोबत नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करत असताना जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात एक जवानही शहीद झाला आहे. बारामुल्ला आणि शोपियांनमद्ये ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
In the last 36 hours, Indian Army has foiled an infiltration attempt by a Pakistani BAT (Border Action Team) squad in Keran Sector. 5-7 Pakistani army regulars/terrorists eliminated, their bodies are lying on the LoC, not retrieved yet due to heavy firing. (Source: Indian Army) pic.twitter.com/gBa89BuQ0M
— ANI (@ANI) August 3, 2019




























































