गूळ पावडरच्या व्यवहारात 2 कोटींचा चुना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

1170

गूळ पावडर व्यवहारात तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. या प्रकरणी तेलंगणा येथील दोघांविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात विजय प्रकाश नाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.डी.एन.शुगर फॅक्टरीच्यावतीने तयार करण्यात आलेली गूळ पावडर विक्रीसंदर्भात व्यंकटेश्वरा ग्लोबल ट्रेडिंग कंपनी कोट्टाचेरु तेलंगना यांच्याशी करार करण्यात आलेला होता. 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2018 या कालावधीत त्यांनी 2 कोटी 75 लाख रुपयांचा माल उचलला. या मालापैकी 80 लाख 70 हजार 550 रुपये दिले. परंतु शिल्लक राहिलेले 1 कोटी 99 लाख 4 हजार 375 रुपये देण्याचे टाळून फसवणूक केली.

या प्रकरणी पांडू मोरीमी शेटी व सुधाकरण बी.व्ही. यांच्याविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या