जळगावच्या एरंडोल, पाचोरा येथे गारपिटीसह वादळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान

443
फाईल फोटो

जळगाव शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीट झाली तर काही तालुक्यांमध्ये वादळी पावसामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात भोंडण, चोरकड, बहादरपूर, उंदीरखेडा यासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकारात विक्रीसाठी आणलेला मका, ज्वारी यांचे नुकसान झाले. एरंडोल तालुक्यातील भोंडण येथे बारीक गारा पडल्या. तसेच उत्राण येथे अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱयामुळे काही घरांचे पत्रे उडाले. पाऊस व गारपिटीमुळे लिंबू व पेरू आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक भागांतील विजेचे खांब वाकले, झाडाच्या फांद्या तुटल्या. 15 मिनिटे झालेल्या या दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीटामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या