
सामना ऑनलाईन । अंकारा
तुर्कीमधील हेबर टेलिव्हिजनने इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासातून एक व्यक्ती काही सुटकेस आणि काळ्या बॅग घेऊ जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज रविवारी रात्री प्रसारित केले. सदर व्यक्ती पत्रकार जमान खाशोग्गी यांच्या मृतदेहाचे अवशेष पाच सुटकेस आणि दोन मोठय़ा बॅगांमधून नेत असल्याचा दावा हेबर टीव्हीने केला आहे.
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक असलेले पत्रकार खाशोग्गी 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूल येथील सैदीच्या दूतावासात गेले होते. त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नव्हता. सौदीचे राजे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानुसार खाशोग्गी यांची इस्तंबूलमध्ये हत्या झाल्याचे आरोप तुर्कीने केले.


























































