जवानाने पत्नीला गुप्तांगात वीजेचा करंट देऊन केले ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
 सामना ऑनलाईन। रायपुर
छत्तीसगड सशस्त्र दलातील एका जवानाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रायपूर येथे घडली आहे. संशयाने झपाटलेल्या या जवानाने आधी पत्नीला मारहाण केली. ती बेशद्ध झाल्यानंतर त्याने तिच्या गुप्तांगात वीजेची तार टाकून तिला करंट दिला. त्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या जवानाला अटक करण्यात आली आहे. सुरेश मिरी असे या जवानाचे नाव आहे. तर लक्ष्मी असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे.

सुरेश पत्नी लक्ष्मी यांना दोन मुलांसह येथील बलोदबाजार-भाटपारा जिल्हयात राहतो. दंतेवाडा येथील छत्तीसगड सशस्त्र दलात तो कुक म्हणून काम करत होता. लक्ष्मीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असे. बुधवारी दुपारीही दोघांमध्ये या विषयावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर लक्ष्मी बाथरुममध्ये कपडे धुण्यास निघून गेली. पण सुरेश मात्र संतापाच्या आगीत चरफडत होता. यामुळे त्याने पुन्हा लक्ष्मीला बेदम मारहाण केली. यात लक्ष्मी बेशुद्ध पडली. पण तरीही सुरेशचा राग शांत झाला नव्हता. लक्ष्मीचा कायमचा काटा काढायचा त्याने निर्णय घेतला.

त्यानंतर बाथरुममध्ये बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मीच्या गुप्तांगात वीजेची तार टाकून त्याने तिला करंट दिला. यात लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने लक्ष्मीच्या घरातल्यांना फोन करुन लक्ष्मीचे आजारपणामुळे निधन झाल्याचे कळवले. सुरेशने लक्ष्मीचा मृतदेह तिच्या माहेरी नेण्यासाठी एक वॅनही बुक केली. पण त्याआधीच लक्ष्मीचे घरातले तिच्या घरी पोहचले. लक्ष्मीचा काळानिळा पडलेला मृतदेह बघून तिच्या घरातल्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसांना कळवलं. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुरेशने चारित्र्याच्या संशयावरून लक्ष्मीची हत्या केल्याची कबुली दिली.