
विधान भवनाच्या पायऱयांवर विधानसभेतील सर्व सदस्यांचे एकत्रित फोटो काढण्याच्या परंपरेला विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरत सभागृहात जोरदार टोलेबाजी करून सत्ताधाऱयांना जेरीस आणले. ते म्हणाले, बहुतेक आमदार फोटोच्या पोझिशनमध्ये पंधरा मिनिटे उभे होते. वास्तविक फोटोला उभे राहताना सदस्यांच्या ज्येष्ठतेचाही विचार झाला नाही. पहिल्या रांगेत दुसऱया टर्मला निवडून आलेले फोटोला पुढे होते आणि ज्येष्ठ आमदारांना मागील बाजूस उभे केले होते. ही बाब फार गंभीर आहे. आतार्यंत सात वेळा असा फोटो काढला आहे, पण अशी घटना प्रथमच घडली. पण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री न आल्याने तुम्ही निघा असा निरोप आम्हाला आला, असे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले. या फोटोसेशनसाठी अनेक आमदार ‘सुटाबुटात’ व ‘टाय’ लावून आले होते, याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले.
फडणवीस-पटोले जुंपली
मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. तुम्ही तरी त्यावर बसून घ्यायचे. नाही तरी तुमच्यात स्पर्धा सुरू आहे, असा टोला नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारला. त्यावर तुम्ही निदान पह्टोसाठी तरी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसला असता, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला. अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत पह्टोसेशनसाठी दुपारी बाराची वेळ निश्चित केली आणि त्यानंतर सर्व सदस्यांचे पह्टोसेशन पार पडले.






























































