चौकशीसाठी नेलेल्या जदयू नेत्याचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू

17
प्रातिनिधिक


सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमधील नालंदा जिल्ह्यात जनता दल युनायटेडच्या एका दलित नेत्याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. गणेश रविदास असे त्या नेत्याचे नाव असून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. या प्रकरणी तीन पोलिसांना अटक करण्यात आले आहेत.

गणेश रविदास हे जदयूचे महादलित सेलचे ब्लॉक अध्यक्ष होते. एका मुलीच्या अपहरणाप्रकरणी गणेश यांना गुरुवारी पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलो होते. मात्र काही वेळाने त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गणेश यांच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दगडफेक केली आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहे.

गावकऱ्यांनी गणेश याने पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. गणेश याच्या कपाळावर मारहाणीच्या खुणा असून पोलिसांनी त्यांचा छळ केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या