
इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया जेईई-मेन परीक्षेच्या चौथ्या सत्राच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. चौथ्या सत्राच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. चौथ्या सत्रातील परीक्षा 27 जुलैऐवजी 26 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. त्यानंतर 27 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर या तारखांना पेपर होणार आहेत.
पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. जेईई-मेनच्या चौथ्या सत्रासाठी ऑनलाइन नोंदणी 20 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या परीक्षेचे तिसरे व चौथे सत्र एप्रिल आणि मे महिन्यात होणार होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जुलै आणि ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले. जेईई-मेन परीक्षा यंदापासून वर्षातून चार वेळा घेतली जात आहे.
























































