
ऍमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजन कंपनीच्या न्यू ग्लेन रॉकेटमध्ये चाचणी सुरू असतानाच लाँचपॅडवर स्फोट झाला. फ्लोरिड येथील केप कॅनावेरलमध्ये गुरुवारी रात्री हॉटफायर चाचणी केली जात होती. याच चाचणीदरम्यान रॉकेटमध्ये बिघाड झाला आणि हा अपघात घडला. स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, अशी माहिती जेफ बेजोस यांनी दिली आहे.
ब्लू ओरिजिनने जवळपास दहा वर्षांत अब्जावधी डॉलर्स खर्च करून हे न्यू ग्लेन रॉकेट तयार केले आहे. हे रॉकेट 29 मजली उंच इमारतीएवढे मोठे आहे. ज्याचा पहिला टप्पा पुन्हा वापरला जाऊ शकतो, म्हणजेच हे रियूजेबल रॉकेट आहे. हे इलॉन मस्कच्या फाल्कन रॉकेट्स आणि शक्तिशाली स्टारशिपशी स्पर्धा करण्यासाठी डिझाइन करण्यात आले.

























































