jet airways संचालक नरेश गोयल यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jet-airways

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी जेट एअरवेजच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे. त्यामुळे कंपनीचे सीईओ विनय दुबे यांच्यावर जेटची जबाबदारी देण्यात आली आहे. वाढत्या कर्जामुळे कंपनीची अवस्था बिकट झाली असून जेटच्या दैनंदिन कामकाजावर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

संचालक मंडळातून राजीनामा देतानाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून भावनिक पत्र देखील लिहिले आहे. जेटवर 25 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे व्यवसायात टिकून राहण्यासाठी जेटला कमीत कमी 10 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. काही बँकांनी जेटच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.