जेट एअरवेजमधील मोफत जेवण होणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने देशांतर्गत विमानसेवेतील इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना येत्या 7 जानेवारीपासून मोफत जेवण न देण्याचे ठरवले आहे. यापुढे प्रवाशांना पैसे देऊनच खानपान सेवेचा आनंद घ्यावा लागेल. बिझनेस क्लासच्या प्रवाशांना मात्र मोफत जेवणाची सुविधा असेल. तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवेत ही सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी खर्चाला आळा घालून उत्पन्न वाढवण्याचा जेट एअरवेजचा प्रयत्न आहे. आतापर्यंत कंपनीने अनेक मार्गावरील विमान उड्डाणे बंद केलेली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर दिलेले नाहीत. रविवारी तर 14 उड्डाणे रद्द करावी लागली होती. पगार न मिळाल्याने तब्येतीचे कारण पायलटनी दिले होते.