
एका तरुणाने आपल्या मावशीसोबत पळून लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. घरच्यांनी विरोध केल्यावर अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण शांतपणे सोडवले. ही घटना झारखंडमधील चतरा येथे घडली आहे.
झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील रक्सी गावातील हे प्रकरण आहे. रक्सी गावातील सोनू राणा याचे आपल्या चुलत मावशीशी प्रेमसंबंध होते. दोघंही एक वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनूने 2 एप्रिलला नात्याने मावशी लागणाऱ्या तरुणीसोबत एका मंदिरात पळून लग्न केले.
त्यांच्या लग्नाला गावातील लोकांनी विरोध केला. अल्पवयीन असल्याने त्यांचे लग्न कायद्याने चुकीचे आहे. अशावेळी दोघंही त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे रात्री थांबले. रात्र कशीतरी काढल्यानंतर दोघंही दुसऱ्या दिवशी पोलीस स्थानकात पोहोचून त्यांची मदत मागितली. सोनू राणा आणि तरुणी दोघेही अल्पवयीन आहेत त्यामुळे दोघांच्याही कुटुंबांना पोलिसांनी स्थानकात बोलावून घेतले.
दोघांच्या घरच्यांना ठाण्याला बोलावून पोलिसांनी समजावले मात्र कोणीही नातेवाईक या लग्नाने आनंदी नव्हते. मात्र काहीही झाले तरी दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघंही अल्पवयीन असल्याने त्यांना समजावून पोलिसांनी नातेवाईकांना समजावले. दोन्ही कुटुंबाकडून बॉन्ड लिहून घेतला आणि आशिर्वाद देऊन त्यांना घरी पाठवले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण थांबले.



























































