2024 ला मतं मागण्यासाठी मी ‘पुन्हा येईन’, तोपर्यंत …! – अमित शहा

4870
amit-shah

झारखंड विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असून दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभांना वेग आला आहे. सोमवारी चक्रधरपूर आणि बहरागोडा येथे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. भाजपचे उमेदवार लक्ष्मण गिलुवा आणि कुणाल षाड़ंगी यांच्या प्रचारासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी 2024 ला मत मागण्यासाठी मी ‘पुन्हा येईन’, तोपर्यंत संपूर्ण देशभारत एनआरसी लागू करून घुसखोरांना हाकलून देण्यात येईल, असा हुंकार शहा यांनी भरला.

प्रचाराच्या भाषणादरम्यान अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना आव्हान दिले. राहुल गांधी देखील झारखंडमध्ये आहेत. मी त्यांना आव्हान देतो की गेल्या 55 वर्षांचे सरकार आणि आमचे 5 वर्षाचे सरकार यांचा हिशोब घेऊन मैदानात उतरा. भाजपने विकासाची गंगा गरिबांच्या घरामध्ये पोहोचवली आहे, असे शहा यावेळी म्हणाले.

7 डिसेंबरला मतदान
दरम्यान, झारखंडमध्ये 7 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सिमडेगा, बहरागोड़ा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपुर पूर्वी, जमशेदपुर पश्चिमी, सरायकेला, चाईबासा, मझगांव, जगन्नाथपुर, मनोहरपुर, चक्रधरपुर, खरसांवा, तमाड़, तोरपा, खूंटी, मान्डर, सिसई आणि कोलेबरा या 20 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या