जियो आणि बीएसनलचे ग्राहक वाढले, इतर कंपनीचे घटले

31

सामना ऑनलाईन । मुंबई 

जियो आणि बीएसनलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली असून व्होडाफोन, टाटा, एअरटेल, रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांत घट झाली आहे. ट्रायने दिलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.  ऑक्टोबर 2018 पर्यंत जियो आणि बीएसनलकडे 1.08  कोटी नवे ग्राहक आले आहेत. तर व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, टाटा, एमटीएनल आणि रिलायन्स कम्युनिकेशन यांचे मिळून 1.01 कोटी ग्राहक कमी झाले आहेत.

जियोने एक कोटीपेक्षा ग्राहक जमवले आहेत तर बीएसएनलने 3.66  लाख नवे ग्राहक जोडण्यात यश मिळ्खवले आहे. ऑक्टोबरमध्ये व्होडाफोनने 73.61  लाख ग्राहक गमावले तर एअरटेलने 18.64  लाख ग्राहक गामवले. टाटाने 9.25 लाख, एमटीएनएलने 8 लाख तर रिलायन्स कम्युनिकेशनने  3831  ग्राहक गमावले आहेत. ट्रायनुसार देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 119.2 कोटी इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या