
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे निवडणूक चिन्ह दिलं आहे. शनिवारी रायगडावर शरद पवार यांच्या पक्षाकडून या पक्षचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 23, 2024
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पंरतू आयोगाने ती तिन्ही चिन्हे न देता दुसरेच चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला दिल्याचे समोर आले आहे. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत दावा केला आहे.
वाजवा तुतारी,
गाडा गद्दारी..! pic.twitter.com/Ki8oA9Pk1p— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 22, 2024
निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना “तुतारी” हे चिन्ह देऊन दिला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.


























































