एटीएमचा पासवर्ड चार अंकीच का असतो? ‘हे’ आहे कारण..

1761

एटीएममुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे. बँकिंगच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी आणि महत्वाचा शोध आहे. एटीएमचा शोध 1969 मध्ये एका ब्रिटीश व्यक्तीने लावला. त्याच नाव आहे जॉन ऍड्रियन शेफर्ड बॅरन. एटीएम वापरण्यासाठी तुम्हाला चार अंकी एटीएम पिन टाकावा लागतो. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की, एटीएम पिन चार अंकीच का आहे? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

बॅरन यांनी एटीएम पिन म्हणून सुरुवातीला 6 अंकी पिनची कल्पना मांडली होती. 6 अंकी आकडे सामान्य माणूस सहज लक्षात ठेवू शकतो का? याचा प्रयोग त्यांनी त्यांच्या पत्नीवर केला. मात्र त्यांच्या पत्नीला 6 अंकी आकडे लक्षात राहत नव्हते. त्यांना फक्त 4 अंकी आकडे लक्षात राहत होते. यानंतर बॅरन यांनी एटीएम पिन 4 अंकी ठेवण्याचा निर्णय घेतला.

4 अंकी एटीएम पिन किती सुरक्षित आहे?

4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 पर्यंत असू शकते, ज्यामध्ये 10000 भिन्न पिन ठेवता येतात. 4 अंकी पिन सहजपणे हॅक करणे शक्य नाही, मात्र 4 अंकी पिन हे 6 अंकी पिनपेक्षा कमी सुरक्षित आहे. स्वित्झर्लंड आणि इतर काही देशांमध्ये 6-अंकी पिन वापरतात.

आपली प्रतिक्रिया द्या