जालना-संभाजीनगर-बीड जिल्ह्यातील पोलिसांचे संयुक्त कोम्बींग ऑपरेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

विविध गुन्ह्यांतील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी जालना, संभाजीनगर-बीड जिल्ह्यामध्ये संयुक्त कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका आरोपीच्या घरी काळविटाची शिंगे मिळून आल्याने त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे गोंदी येथे वन्य जिव संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या मोहिमेसाठी विविध जिल्ह्यांतील पथके आली होती.

शहागड, वडीगोद्रीसह या परिसरात संभाजीनगर, बीड जिल्ह्याचाही बहुतांश भाग असल्यामुळे आरोपी या भागात लपलेले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी विविध पथके पाठवून आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या आदेशाने २७ डिसेंबर ७ ते २८ डिसेंबर रोजी ५ वाजेपर्यंत जालना, बीड, संभाजीनगर या तिन जिल्ह्याची संयुक्त कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. कॉम्बींग ऑपरेशन करीता दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस अधिकारी, ८२ पोलीस कर्मचारी पोलीस ठाणे गोंदी, अंबड, घनसावंगी , स्थानिक गुन्हे शाखा, विकृदल जालना, पोलीस स्टेशन चंकलंबा जि. बीड, पोलीस स्टेशन पाचोड, जि. संभाजीनगर येथील अधिकारी कर्मचारी होते.

कोम्बींग दरम्यान जालना, बीड, संभाजीनगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीतांच्या २६ वस्त्या चेक केल्या, हिस्ट्रीशिटर-११ चेक केले, पाहिजे असलेले २४ आरोपी तपासले. पाहिजे व फरारी ४, रेकॉर्डवरील घरफोडी करणारे ५ आरोपी, वॉरन्ट असलेले १६ जण ताब्यात घेतले असून असे एकूण ३१ रेकॉर्ड वरील आरोपीविरुध्द कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच त्यामधील एका आरोपीच्या घरी काळविट प्राण्याचे शिंगे मिळून आल्याने त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे गोंदी येथे वन्य जिव संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

कोँम्बींग दरम्यान नाकाबंदी करुन १७ संशईरात वाहने तपासणी केली. तसेच कोंम्बींग दरम्यान एका आरोपीच्या घरी चोरीचे चांदीचे दागिने ५६० ग्रॅम किंमत १५ हजार रुपयांचे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंपालाल शेवगण, गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, गोंदीचे अनिल परजने, संभाजीनगरचे हनुमंत वारे, बीड जिल्ह्यातील अधिकारी
असे १२ अधिकारी, पोलीस कर्मचारी पोलीस ठाणे गोंदी, अंबड, घनसावंगी, स्थानिक गुन्हे शाखा, विकृदल जालना, पोलीस ठाणे चंकलंबा, पोलीस ठाणे पाचोड, असे एकुण ८२ पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.