
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूर दौऱयावर आले होते. त्यांनी शिवस्मारक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सत्ताकेंद्र ताब्यात असतानाही भाजपच्या आमदारांनी विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत पत्रकारांनी भाजप नेत्यांना उघडे पाडले आणि अनावश्यक बडबड करणाऱया बावनकुळे यांची बोलती बंद झाली. यावेळी पाणीप्रश्नावर बोलताना ‘मी वेडा आहे काय?’ असा संताप बावनकुळे यांनी व्यक्त केला.
पत्रकारांनी बावनकुळे यांना विकासाबाबत प्रश्न विचारले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सत्ताकेंद्र भाजपच्या ताब्यात आहे. तरीही कोणताही आमदार पिंवा खासदार विकासाकडे लक्ष देत नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.
मी वेडा आहे काय?
बावनकुळे यांची पत्रकार परिषद सुरू होताच पत्रकारांनी शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. या प्रश्नाकडे तुमचे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची तक्रार करताच उत्तर देण्याऐवजी ‘मी वेडा आहे काय?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यानंतर संयम सुटलेल्या बावनकुळे यांनी थातूरमातूर उत्तरे देत शेजारी बसलेल्या खासदार आणि आमदारांना फटकारत मीच या प्रश्नाकडे लक्ष घालणार असल्याचे सांगितले.




























































