हिंदुस्थानसमोर पेच, आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद काढून घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mat-kusti

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्षाचा फटका हिंदुस्थानच्या कुस्तीला बसला आहे. ज्युनियर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे यजमान हिंदुस्थानकडून काढून घेण्याचा निर्णय जागतिक कुस्ती संघटनने (यूडब्ल्यूडब्ल्यू) रविवारी घेतला आहे.

जुलैमध्ये आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणारे आहे. या स्पर्धेचे यजमान हिंदुस्थानकडे देण्यात आले होते. मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्थानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या खेळाडूंना डावलल्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कुस्ती फेडरेशनने हिंदुस्थानच्या फेडरेशनला फटकारले. हिंदुस्थानच्या कुस्ती फेडरेशनशी कोणतेच संबंध किंवा व्यवहार ठेवू नये संघटनेने आपल्याशी संलग्न संस्थांना फर्मान सोडले होते.