
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांना कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून कादर खान त्यांचा मुलगा आणि सून यांच्याबरोबर कॅनडात राहत आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘ट्विट’ करून कादर खान यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली. ‘मी त्यांना रंगभूमीवर अभिनय करताना पाहिले, त्यांनी संवाद लिहिलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. ते एक चांगले सोबती, उदार मनाचे माणूस आहेत. ते आजारपणातून लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो,’ असे ते म्हणाले.

























































