आशिष निनगुरकर यांना ‘कलाभूषण’ प्रेरणा पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या नवव्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये हरहुन्नरी कलावंत, कवी आशीष निनगुरकर यांना ‘कलाभूषण’ प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर, इंगळी आयोजित कन्या मंदिर इंगळीच्या प्रांगणात झालेल्या नवव्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. शांतिनाथ मांगले व ज्येष्ठ कवियत्री वासंती मेरू यांच्या हस्ते निनगुरकर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी संमेलनाचे आयोजक कवी सरकार, रावसाहेब पाटील, डॉ. साताप्पा चव्हाण व किसनराव कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.