
मुंबई विद्यापीठाच्या कालिना पॅम्पसमधील ई-15 या प्राध्यापक निवासात 16 प्राध्यापकांची कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या क्वॉटर्सची अत्यंत दुरावस्था झाली असून सध्या या इमारतीची बाहेरून डागडुजी सुरू असतानाच तिसऱया मजल्यावरील खोलीत अचानक स्लॅब कोसळल्याने एका प्राध्यापकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
कालिना पॅम्पसमधील ई-15 या इमारतीत प्राध्यापकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पण या इमारतीत प्राध्यापक कुटुंबियांसह जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या तर आहेच याशिवाय इमारतीची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. सध्या इमारतीच्या बाहेरील बाजूने डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्राध्यापकांना सिमेंट, रेतीच्या सान्निध्यातच रहावे लागत आहे.
एकूण चार मजल्यांची इमारत असून बुधवारी तिसऱया मजल्यावरील एका खोलीत अचानक स्लॅब कोसळला. या स्लॅबचा काही भाग एका प्राध्यापकाच्या हातावरच पडल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या इमारतीत राहणाऱया प्राध्यापकांनी वेळोवेळी आपल्या समस्यांविषयी विद्यापीठाच्या रजिस्टारना पत्र दिले. ई-मेलद्वारेही आपल्या समस्या मांडल्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. कारवाईच्या भीतीने याप्रकरणी सविस्तर माहिती देण्यासही प्राध्यापक तयार नाहीत. दरम्यान या अपघातानंतर संबंधित प्राध्यापकाने विद्यापीठाशी संपर्क साधला असता कॉन्ट्रक्टर आणि अभियंताने लागलीच पाहणी केली आहे.


























































