
अग्निशमन दलाने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तींची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमातील तरतुदीनुसार कांदिवली (प.) येथील हंसा हेरिटेज इमारतीचे अध्यक्ष व सचिवांना एमआरटीपीअंतर्गत नोटीस पाठवण्यात आल्याची व विकासक व आर्किटेक्टच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. कांदिवली येथील हंसा इमारतीला लागलेल्या आगीच्या संदर्भात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात एकनाथ शिंदे यांनी दिली. 6 नोव्हेंबर 2021 रोजी लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाला. इमारतीचे विकासक, सेक्रेटरी, चेअरमन व आर्किटेक्टच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल झाला आहे.



























































