
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री कंगना रानौत आणि वाद असे एक समीकरणच झाले आहे. चित्रपटाच्या सेटवर असो किंवा मग मुलाखतीत कंगनाच्या वक्तव्यांवरून वाद होत नाही असे विरळाच. सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री असलेल्या कंगनाचा आता तिच्या आगामी चित्रपटातील सह कलाकार सोनू सूद सोबत वाद झाला आहे. त्यांच्या या वादामुळे सोनूने मणिकर्णिका या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे.
कंगनाने मला ‘कामातूर’ ईमेल पाठवले ह्रितीक रोशनचा आरोप
मणिकर्णिका या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सोनू सूद देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता. मात्र कंगना या चित्रपटात दिग्दर्शकासोबत दिग्दर्शन देखील करत आहे. त्यामुळे सेटवर ती सतत सोनूला काही ना काही सल्ले देत होती. सोनूला त्याच्या कामात कंगनाचे दखल देणे पचनी पडत नव्हते. त्यामुळे कंगनाच्या सततच्या सल्ल्यांवरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सोनूने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने याबाबत निर्मात्यांना कळविले आहे. सोनूने अचानक हा निर्णय घेतल्याने निर्मात्यांना धक्का बसला आहे. कंगनाच्या या अशा वागण्यामुळे सध्या मणिकर्णिकाच्या सेटवर देखील प्रचंड असंतोष असून अनेकजण तिच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
कंगना रानौत विरोधात फसवणूकीची तक्रार
दरम्यान कंगनाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी आणि सोनू क्रिश या चित्रपटाचा शेवटचा सीन शूट केल्यापासून भेटलेलो नाही. तो सध्या सिम्बा चित्रपटात व्यस्त आहे. त्याने मणिकर्णिका चित्रपटासाठी आम्हाला तारखाही दिलेल्या नाहीत’, असे कंगनाने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
summary : Sonu Sood walks out of Manikarnika after fight with Kangana Ranaut



























































