कांजूरच्या मेट्रो कारशेडमुळे राज्याचे दीड हजार कोटी रुपये वाचतील, 9 जणांच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-बांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो-3 साठी आरेऐवजी कांजूरमार्ग येथे कारशेड उभारल्यास राज्याचे तब्बल 1 हजार 580 कोटी वाचणार आहेत. मेट्रो कारशेडच्या अभ्यासासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या नऊ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने अहवालात कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास सकारात्मकता दर्शविली आहे.

मेट्रो तीनचा कार डेपो आरे येथे उभारायचा की कांजूरमार्गमध्ये, यावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. कारशेड अन्य ठिकाणी हलविल्यास या प्रकल्पाचा खर्च वाढेल असा अपप्रचार विरोधकांकडून कारशेडच्या मुद्दय़ावरून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कारशेडच्या अभ्यासासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली होती. या समितीने कांजूरमार्ग येथील जागेत कारशेड बांधल्यास फायदेशीर ठरेल, असा असा अहवाल दिला आहे. यामुळे आरेऐवजी कांजूर येथे कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधकांचा आक्षेप काय?

–  मेट्रो-3च्या कारशेडची आरे येथील जागा बदलल्यास प्रकल्प रखडेल आणि राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होईल.
– प्रशासकीय अधिकाऱयांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल होत आहे. खासगी किकासकांना मोठे आर्थिक लाभ देण्यासाठीसुद्धा हालचाली होत असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांच म्हणणं आहे.

अहवालात काय म्हटलंय?

– कारशेड कांजूरमार्गला हलविल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये 1 हजार 580 कोटी रुपये काचतील.
– कांजूरमार्ग येथील जागा आरे येथील जागेपेक्षा मोठी आहे. आरे कारशेडमध्ये केकळ 30 मेट्रो उभ्या राहू शकतात. याउलट, कांजूरमार्ग येथील जागेत 55 मेट्रो उभ्या राहू शकतात.