कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांकडून तीन आमदारांचे निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेंगळूरु

कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटक सुरू झाले आहे. विधानसभा अध्यक्षांनी तीन आमदारांचे निलंबन केले आहे. तसेच सध्याच्या विधानसभा कार्यकाळात ते निवडणूकही लढवू शकत नाही असेही अध्यक्ष्यांनी सांगितले आहे. त्यात दोन काँग्रेसचे बंडखोर आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे.

विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी आर शंकर, रमेश जरकिहोली आणि महेश कुमथल्ली या तीन आमदारांना निलंबीत केले आहे. या तिघांनी नियम डावलून राजीनामा दिल्याचे अध्यक्ष कुमार यांनी सांगितले. सध्याच्या कार्यकाळात हे तिनही आमदार पदावर राहणार नाहीत. तसेच या विधानसभेच्या काळात ते निवडणूकही लढवू शकत नाही असे कुमार यांनी सांगितले. सध्याची विधानसभा भंग झाली तरच ते निवडणूक लढवू शकतात असेही कुमार यांनी सांगितले.

अध्यक्ष कुमार म्हणाले की “तिनही आमदारांनी अनुसुची 10 चे उल्लंघन करून त्यांनी राजीनामे दिले आहेत.त याचे पुरावे मिळाल्याने ही कारवाई केली आहे. या आमदारांसमोर दोनच पर्याय आहेत एकत त्यांनी उच्च न्यायालयात जावे किंवा सर्वोच्च न्यायालयात जावे.” विधानसभेत मंगळवारी एचडी कुमारस्वामी यांना विश्वास मत जिंकता नाही आले. कर्नाटक विधानसभेत 225 सदस्य आहेत त्यापैकी 20 आमदार अनुपस्थित होते.