पतीला एड्स झाल्याने पत्नीची नोकरी गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीला एड्स झाल्यामुळे पत्नीची नोकरी गेल्याची घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे घडली. ही महिला राज्य सरकारच्या एका विभागात हाऊस कीपिंगचे काम करत होती. तिला 7,500 रुपये वेतन होते. पतीच्या आजारपणामुळे तिची नोकरी दिली. याप्रकरणी लोकपालाने केलेल्या हस्तक्षेपामुळे महिलेला नोकरी परत मिळाली.  तीन वर्षांपूर्वी महिलेला नोकरी मिळाली होती, मात्र पतीच्या आजारपणामुळे तिची नोकरी गेली. पती आजारी पडल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्याला एड्स असल्याचे समजले. महिलेच्या कामाच्या ठिकाणी याबद्दल समजल्यावर तिला जबरदस्तीने तीन महिन्यांचे वेतन देऊन घरी पाठवण्यात आले. तीन महिन्यांनंतर महिला कामावर गेली असता तिला काम देण्यास टाळाटाळ करण्यात आली.