निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून आणि ईडीसारख्या यंत्रणांचा उपयोग करत विविध कंपन्यांकडून कथितपणे हजारो कोटी रुपयांची खंडणीवसुली केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरनुसार तपास करण्यास सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या एफआयआरमध्ये क्रमांक चार चे आरोपी असलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी दाखल केलेल्या याचिकेकर न्या. एम. नागप्रसन्ना यांनी हे अंतरिम आदेश दिले.