
कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याने एकच खळबल उडाली आहे. दक्षिण कर्नाटकातील चिकमगळुर या धर्मेगौडांच्या मूळगावात हा प्रकार घडला. मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यामागच कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.
गोरक्षा कायद्यावरून कर्नाटक विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी झालेल्या राडय़ात उपसभापती धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. यावेळी कॉँग्रेस आमदारांनी अक्षरशः त्यांना खुर्चीवरून खाली खेचत सभागृहाच्या बाहेर काढले होते. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच धर्मेगौडा यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.
धर्मेगौडा यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. ते खूपच शांत आणि सभ्य नेता होते. यामुळे राज्याला मोठं नुकसानं झालंय, असं जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.
























































