‘बसवराज बोम्माई’ असतील कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी एका खासगी हॉटेलमध्ये भाजप पक्षातील विधिमंडळ सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून ‘बसवराज बोम्माई’ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते लिंगायत समाजातील आहेत. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे गृहमंत्री राहिले आहेत.

भाजप विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत येडियुरप्पा यांनी बोम्मई यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. गोविंद करजोल यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. ज्यास सर्व आमदारांनी सहमती दर्शविली. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर बोम्माई यांनी येडियुरप्पा यांच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतला. दरम्यान, एस. येडियुरप्पा सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

आपली प्रतिक्रिया द्या