या अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण असणं आवडेल, कतरिनाचा खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या आगामी भारत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनच्या दरम्यान तिला विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर काहीसं खळबळजनक दिल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिने एका अभिनेत्रीचं नाव घेत तिच्याशी अफेअर करायला आवडेल, असा खळबळजनक खुलासा केला आहे.

या अभिनेत्रीचं नाव करिना कपूर असं आहे. एका हिंदी बॉलिवूड वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतच्या प्रमोशनदरम्यान कतरिनाला एक प्रश्न विचारण्यात आला. जर तिला कुणाशी अफेअर करायला सांगितलं तर ती कुणाची निवड करेल, या प्रश्नावर कतरिनाने करिना हिचं नाव घेतलं. करिना खूप सुंदर आणि उत्साही आहे. मला तिच्यासोबत काम करायला आवडेलच पण तिच्यासोबत अफेअरही करायला आवडेल, असं कतरिना म्हणाली.

करिनासोबत एखादा चित्रपट करण्याची इच्छा असून लवकरच ती इच्छा पूर्ण व्हावी अशी मी आशा करते, असंही कतरिनाने म्हटलं आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत ब्रेकअपवरही तिने मन मोकळं केलं. रणबीर हा विश्वासार्ह माणूस नसल्याचं कतरिनाने म्हटलं आहे.