केदार, मुलानीने गाजवला दिवस

555

पहिला दिवस मुंबईच्या फलंदाजांनी गाजवल्यानंतर शम्स मुलानी अॅण्ड कंपनीने रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील बडोद्याविरुद्धच्या लढतीत मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 431 धावा तडकावल्या.

त्यानंतर शम्स मुलानीच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बडोद्याच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. त्याने निम्मा संघ गारद केल्यामुळे बडोद्याची दुसऱ्या दिवसअखेर अवस्था 9 बाद 301 धावा अशी झाली. त्यामुळे मुंबईची पहिल्या डावातील आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र सलामीवीर केदार देवधर याने एकाकी किल्ला लढवताना 1 षटकार व 20 चौकारांसह नाबाद 154 धावांची खेळी करीत बडोद्यासाठी छान कामगिरी केली. मुंबईने 8 बाद 362 या धावसंख्येवरून मंगळवारी पुढे खेळायला सुरुवात केली. शम्स मुलानीने 2 षटकार व 11 चौकारांसह 89 धावांची खेळी साकारली.

आपली प्रतिक्रिया द्या