वाडा संस्कृतीचे घडतंय दर्शन, खालापूरच्या शिरसे कुटुंबियांच्या कल्पकतेचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती गणपती समोर आकर्षक सजावट केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित देखावे साकारले जातात. खालापूर तालुक्यातील मुक्काम ठाणेन्हावे येथील जयेश शिरसे यांनी संस्कृती संवर्धनाचा संदेश देत खास देखावा उभारला आहे. त्यांनी कागद आणि पुठ्ठय़ांपासून वाडा उभारला असून त्यामध्ये कालबाह्य होणाऱया वस्तूंचे दर्शन घडवले आहे.

दरवर्षी शिरसे कुटुंबियांचे गणपती डेकोरेशन आकर्षक असते. यंदा त्यांनी वाडा संस्कृती हा विषय घेतला आहे. पर्यावरणपूरक साहित्य वापरून त्यांनी 11 फूट लांब आणि 9 फूट उंच आणि 4 फूट रुंद वास्तू उभारली आहे. त्यामध्ये जातं, पाटा, आडोली, निटवा, टिपरी, खलबत्ता, टोपली, पंदील, दगडी दिवा या वस्तू पुठ्ठा आणि पेपर यापासून तयार केल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून शिरसे कुटुंबीय यावर काम करत आहेत.