खार येथे तोतया पोलिसाने वृद्ध महिलेचे दागिने लांबवले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.  वृद्ध महिला रविवारी मार्पेटमध्ये गेल्या होत्या. घरी परतत असतानाच आराधना इमारतीजवळ दोन जण आले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे भासवले. शहरात चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दागिने काढून ठेवा असे महिलेला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने दागिने पर्समध्ये ठेवले. ठगाने महिलेला बोलण्यात गुंतवून त्यानंतर दागिने घेऊन त्यांनी पळ काढला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडओरड केली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या ठगाचा शोध घेत आहेत.