खेड तालुक्यात 24 गावे आणि 42 वाड्यांना दरड कोसळण्याचा धोका, तीन गावातील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यालत तब्ब्ल 24 गावे आणि 42 वाड्या दरडप्रवरण क्षेत्रात येत असून या गावांना पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. या पैकी तीन गावे अतिशय धोकादाय असल्याने त्या गावातील ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाने स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्यान खेड तालुक्यातील ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. पोसरे बौद्धवाडी येथे कोसळल्या दरडीखाली गाडले जाऊन 16 जणांचा तर बिरमणी गावातील एका घरावर दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. याशिवाय रघुवीर घाट, नातूनगर मोरेवाडी, या ठिकाणी देखील दरड कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. गतवर्षीच्या पावसाळ्यात घडलेल्या घटनांची पुरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दरडप्रवरण क्षेत्राचा आराखडा तयार केला असून ज्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या धोका अधिक आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत

तालुका प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार तालुक्यातील 24 गावे आणि तब्ब्ल 42 वाड्या दरड प्रवरण क्षेत्रात येत आहेत. या गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. भौगोलिक दृष्ट्या उभा-आडवा पसरलेल्या खेड तालुक्यातील काही गावे तालुका ठिकाणांपासून दूर आणि डोगनरल भागात आहेत. या ठिकाणी रस्ते आणि मोबाईल सेवा अदयाप पोहचली नसल्याने दरड कोसळण्याची माहिती मिळण्यास किंवा जागेवर पोहचण्यास वेळ लागत असल्याने येथील ग्रामस्थांना मंडळ मिळण्यास विलंब होतो या पार्शभूमीवर तालुका प्रशासनाने प्रत्येक दरडग्रस्त गावासाठी एका नोडल अधिकाऱ्याची निवड करण्यात आली असून हे नोडल अधिकारी अतिवृष्टिदरम्यान दरडप्रवरण गाव-वाडयांवर लक्ष ठेवून असणार आहेत.

अतिवृष्टी दरम्यान एखाद्या गावात नैसर्गिक आपत्ती कोसळली तर त्या गावातील ग्रामस्थांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने होडी, स्पीड बोट, दोरखंड, कटर आदी तयारी करून ठेवली आहे. सोबत प्रशिक्षत जवान देखील असणार आहेत अशी माहिती खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.