कोरोना वाढतोय…किंग खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता शाहरुख खान याला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. किंग खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याआधी ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती.

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वर काढायला सुरुवात केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना सुपरस्प्रेडर ठरल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. तो बरा होत नाही तोच अभिनेता कार्तिक आर्यन , आदित्य रॉय कपूर , कतरिना कैफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.