सोमय्या पिता-पुत्र पोलिस ठाण्यात गैरहजर,पोलिसांनी चौकशीसाठी बजावला होता समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विक्रांत’ युद्धनौका वाचविण्यासाठी जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळ्या करणारे किरीट सोमय्या व नील सोमय्या हे पिता-पुत्र आज चौकशीसाठी गैरहजर राहिले. दोघांनाही समन्स बजावून सकाळी 11 वाजता ट्राँम्बे पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

‘विक्रांत’ वाचविण्याच्या नावाखाली किरीट आणि नील सोमय्या यांनी विविध ठिकाणी लोकांकडून निधी गोळा केला होता. हा निधी राज्यपाल किंवा लष्कराकडे सुपूर्द करू असे किरीट सोमय्या यांनी तेव्हा म्हटले होते. मात्र असा कोणाताही निधी आमच्याकडे जमा झालेला नसल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली होती. त्यामुळे एका माजी सैनिकाने ट्राँम्बे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी किरीट व नील सौमय्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांनाही चौकशीसाठी शनिवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा समन्स पोलिसांनी बजावला होता. पण दोघे पिता-पुत्र आज पोलिस ठाण्यात गैरहजर राहिले. किरीट सौमय्या हे समन्स मिळण्याआधीपासून महाराष्ट्रा बाहेर आहेत. त्यामुळे १३ तारखेनंतर दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात यावे असा विनंती अर्ज सौमय्या यांच्या वकिलांनी पोलिसांकडे केला.