तांब्याच्या हजारो नाण्यांपासून सजवले किचन, महिलेची क्रिएटिव्हिटी होतेय व्हायरल

लॉकडाऊनच्या मोकळ्या वेळेत अनेक जणांनी आपले छंद जोपासले. काही जण नवनवीन गोष्टी शिकले. असाच लॉकडाऊनचा रिकामा वेळ सत्कारणी लावत एका महिलेने तब्बल 7500 तांब्याच्या नाण्यांपासून आपले किचन सजवले आहे. या अनोख्या किचनचे फोटो सध्या व्हायरल होत असून महिलेच्या क्रिएटिव्हिटीचे काैतुक होत आहे.

इंग्लंडमध्ये राहणाऱया या महिलेचे नाव वेलस्बी असे आहे. 49 वर्षीय वेलस्बी यांनी 7500 तांब्याच्या नाण्यांपासून आपल्या किचनच्या भिंती सजवल्या आहेत. किचनच्या सजावटीसाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या क्रिएटिव्हिटीला चालना देत आपल्या किचनला नवा लूक दिला आहे. किचनमध्ये त्यांनी एक बोर्ड लावला आहे. त्यावर ही आमची आनंदाची जागा, असे लिहिले आहे. या किचनचे फोटो व्हायरल होत असून युजर त्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना ही नवी कॉन्सेप्ट आवडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या