के. एल.राहुलची मोठी झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत चार दिग्गज हिंदुस्थानी फलंदाजांनी 10 फलंदाजांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. 841 रेटिंग गुणांसह 27 वर्षीय सलामीवीर शुभमन गिल एकदिवसीय फलंदाज म्हणून यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानी विराट कोहली (781 गुण) आणि चौथ्या स्थानी रोहित शर्मा (770) आहे. फलंदाज के. एल. राहुलने हिंदुस्थानी फलंदाजांच्या या यादीत सर्वात मोठी झेप घेतली असून सात स्थानांची झेप घेत तो संयुक्तपणे दहाव्या स्थानी पोहोचला आहे.

राहुलने या क्रमवारीत 17 व्या स्थानावरून 7 स्थानांची झेप घेत आयर्लंडच्या हॅरी टेक्टरसोबत 10 वे स्थान पटकावले आहे.विंडीजविरुद्धच्या सामन्यातील शतक हे राहुलच्या स्पह्टक फलंदाजी दर्शवणारी ठरली आहे.