नाद खुळा! कोल्हापुरातील हॉटेलमध्ये वेटरऐवजी रोबोट करतायत काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसलात आणि तुमची ऑर्डर घ्यायला आणि तो पदार्थ तुमच्या टेबलपर्यंत पोहोचविण्यासाठी एखादा रोबोट आला तर… ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी कोल्हापूरमधील एका पठ्ठय़ाने ती प्रत्यक्षात उतरवली आहे. कोल्हापूरमधील शिवाजी उद्यम नगरमधील इडली स्क्वेअर या हॉटेलमध्ये वेटरऐवजी चक्क रोबोट ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्याची सर्विस देतायत. ग्राहकांसाठी हॉटेलमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी या हॉटेलचे मालक महेश बुधले यांना ही संकल्पना सुचली. त्यांनी तैवानच्या एका कंपनीकडून दोन रोबोट तयार करून घेतले. ‘कॅट्टी’ आणि ‘मॅट्टी’ अशी रोबोंची नावे आहेत. रोबोटला टेबल नंबरवर जायच्या सूचना दिल्या की, त्या टेबलवर रोबोट जातो आणि ग्राहकाची ऑर्डर पोहोचवतो. त्यानंतर ग्राहकाने एक्झिट बटन दाबले की पुन्हा तो किचनमध्ये जातो. त्यामुळे हे रोबोट कोल्हापूरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत.