कोल्हार येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची संगमनेरजवळ आत्महत्या

341

कोल्हार महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे ( वय 19 ) मृत युवकाचे नाव आहे.

मयत दत्तात्रय प्रवरा शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याची लहान बहिण याच महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असल्याचे समजते. गुरुवारी सकाळी दत्तात्रय हा महाविद्यालयात हजर होता. महाविद्यालयातून सुट्टी झाल्यानंतर तो मोटारसायकल घेऊन लोणी -संगमनेर जवळ असलेल्या दुधेश्वर महादेव मंदिराजवळील ओसाड जागेत गेला. तेथे त्याने गणवेशाचा शर्ट व स्वेटरच्या साहाय्याने गळफास घेतला.

मात्र सदर युवकाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच ही आत्महत्या एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याची कुजबुज परिसरात सुरू आहे. त्यामुळे अश्वी पोलीस दोन्ही गोष्टींचा तपास करत आहेत. याप्रकरणी अश्वी पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशनचे वाघमारे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या