Ration Scam: रेशन घोटाळा प्रकरण, रितुपर्णा सेनगुप्ताने लावली ईडीसमोर हजेरी

कोट्यावधी रुपयांच्या रेशन घोटाळा प्रकरणात बुधवारी बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाली, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. रुतुपर्णाला तिच्या बँक व्यवहारांशी संबंधित काही विशिष्ट कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सेनगुप्ता हिला त्यांच्या बॅंकेतील काही संशयास्पद व्यवहाराची चौकशी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे काही तिच्यासाठी प्रश्न होते. त्यांच्या बॅंकेतील संशयास्पद व्यवहारांबाबत माहिती घेत आहोत. ते व्यवहार कुठून आणि कोणी केले याची माहिती घेत आहोत.

ईडीने यापूर्वी अभिनेत्रीला याच प्रकरणात 5 जून रोजी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी वैयक्तिक कारणास्तव अमेरिकेला गेलेल्या सेनगुप्ता यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली होती की तिला परत आल्यावर दुसऱ्या तारखेला आपल्यासमोर हजर राहण्याची परवानगी द्यावी. रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने 2019 मध्ये रितुपर्णाचीही चौकशी केली होती.